वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयर्लंडचा क्रिकेट संघ विंडीजबरोबर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी गेल्या महिन्यात घोषित करण्यात आलेल्या आयर्लंडच्या 14 जणांच्या टी-20 संघात तीन बदल करण्यात आले आहेत.
अनुभवी वेगवान गोलंदाज मार्क अॅडेरचे पुनरागमन झाले आहे तसेच क्रेग यंग आणि अष्टपैलू कर्टिस कॅम्फर यांनाही दुखापतीमुळे या मालिकेत खेळता येणार नाही. त्याचप्रमाणे गॅरेथ डिलेनीला दुखापतीमुळे या मालिकेसाठी वगळण्यात आले आहे. पॉल स्टर्लिंगकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. 22 वर्षीय टीम टेक्टर हा या संघातील नवोदित चेहरा आहे. टेक्टरने गेल्या फेब्रुवारी महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते. यष्टीरक्षक आणि फलंदाज स्टिफेन डुहेनीचे संघात पुनरागमन झाले आहेत. गेव्हीन होय हा या संघातील नवा खेळाडू आहे.
आयर्लंड संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अॅडेर, रॉस अॅडेर, टिम टेक्टर, स्टिफेन डुहेनी, जॉर्ज डॉक्रेल, मॅथ्यु हंप्रेज, जोश लिटल, बॅरी मॅक्रेथी, लियाम मॅक्रेथी, हॅरी टेक्टर, टकेर, व्हाईट आणि गेव्हीन होय
पहिला टी-20 सामना 12 जून-ब्रॅडी
दुसरा टी-20 सामना 14 जून-ब्रॅडी
तिसरा टी-20 सामना 15 जून-ब्रॅडी









