मंडणगड/ प्रतिनिधी
नवीन वर्षात रत्नागिरी पोलिसांनी चमकदार कामगिरी केली आहे. खवल्या मांजराची खवले आणि तिघे संशयित पोलिसांनी पकडले आहेत. मंडणगड पोलीस ठाणे हद्दीमधील लाटवण-दापोली रोड वरील घाटातून काही व्यक्ती वन्यजीवी प्राणी, खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करिता वाहतूक करणार आहेत अशी गुप्त बातमी मिळाली होती. त्यानंतर खेड पोलीस ठाणे येथील पो.उप.निरीक्षक हर्षद हिंगे यांनी पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मंडणगड यांचेसह, खेड व मंडणगड पोलीस ठाणे यांचे संयुक्तिक पथक तयार केले व या पथकासह मंडणगड पोलीस ठाणे हद्दीमधील लाटवण-दापोली रोड वरील घाटामध्ये येऊन सापळा रचला. अगदी थोड्याच वेळात, या घाटातून एका दुचाकीवरून 3 इसमांना संशयितरित्या जाताना या पथकाने थांबविले व लागलीच त्यांची झडती घेता,त्यांच्या ताब्यात असलेल्या एका पिशवीत “वन्यजीवी प्राणी, खवल्या मांजराचे 4.372 कि. वजनाचे खवले” मिळून आले. या दरम्याने, आणखीन एक संशयित इसम आपल्या चारचाकी वाहनासह तेथे आल्याचे पाहून या पोलीस पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु अंधाराचा फायदा घेऊन हा इसम आपल्या वाहनासह तेथून फरार झाला आहे.
या कारवाईमध्ये, 3 इसमांना, वन्य जीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2 9 39 (2), 48, 49 व 51 प्रमाणे मंडणगड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून, दुचाकी व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या गुह्यामधील वन्यजीवी प्राण्याची (खवले मांजराची) हत्या / शिकार कोठे झाली आहे? व अन्य फरार व्यक्तीला शोधण्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस उप निरीक्षक हर्षद हिंगे, खेड पोलीस ठाणे, पोलीस काॅनस्टेबल मोरे, पोलीस मुख्यालय, पोलीस कॉन्स्टेबल जोगी, खेड पोलीस ठाणे, पोलीस कॉन्स्टेबल कडू, खेड पोलीस ठाणे, पोलीस कॉन्स्टेबल 1323 गीते, खेड पोलीस ठाणे, पोलीस कॉन्स्टेबल 1199 झेंड, खेड पोलीस ठाणे, पोलीस कॉन्स्टेबल 502 माने, मंडणगड पोलीस ठाणे, अनिल राजाराम दळवी, वनपाल, मंडणगड यांनी संयुक्तपणे केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









