सांगली :
जबरी चोरीच्या गुन्ह्यात चार वर्षे फरारी राहुल सतीश माने (२८, रा. माजी सैनिक वसाहत मिरज), दुचाकीच्या गुन्ह्यात पाच वर्षे चकवा देणारा महादेव उर्फ हनुमंता निवृत्ती सातपुते (३४, रा. कवलापूर) तसेच जबरी चोरीमध्ये शिक्षा लागल्यानंतर नऊ वर्षे फरारी आरोपी सुरेश बाबुराव शिंदे (३१, रा. गोसावी गल्ली तासगाव) या तिघांना विशेष पोलिस पथकाने अटक केली. पथकाला खून, जबरी चोरी, गांजा विक्री, बेकायदा पिस्तुल बाळगणे आणि ‘मोका’ अंतर्गत कारवाई झालेला राहुल माने हा चोरीच्या गुन्ह्यात चार वर्षे फरारी मिरजेत पेट्रोलिंग करताना आढळून आला. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. मानेवर एकुण १८ गुन्हे दाखल आहेत. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पाच वर्षापासून फरारी नाव, पत्ता बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या महादेव उर्फ हनुमंता सात्पुतेला सांगली शहरात फिरताना ताब्यात घेतले. त्याला कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग केले. तासगाव पोलिस ठाणे हद्दीतील चोरीच्या प्रकरणात शिक्षा लागल्यानंतर नऊ वर्षे फरारी आरोपी सुरेश शिंदे हा पुसेगाव मध्ये असल्याचे समजल्यानंतर पथकाने तेथे जाऊन ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विकास पाटणकर, दिनकर चव्हाण, हवालदार दीपक पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.








