वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशाच्या नयागड जिल्ह्यात 21 वषीय महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. ही घटना 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी फतेहगढ राम मंदिरातून परतत असताना घडली होती. पिठाखई जंगलाजवळ काही तरुणांनी महिलेला अडवून अज्ञातस्थळी नेले. त्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे ही घटना सर्वदूर पसरली होती.









