सांगली :
विश्रामबाग परिसरात घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघा संशयितांकडून एक लाख २६ हजार १३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितामध्ये निखिल मिरासाब माडीग (वय २१, रा. शांतीनगर, चौथी गल्ली, मद्रासी कॉलनी सांगली), अनिकेत आकाश साबळे (वय २३, रा. शंभर फुटी रोड वीज बोर्डाच्या पाठीमागे शाहूनगर सांगली), राजू अशोक सोनावले (वय २३, रा. शंभर फुटी रोड नुराणी मस्जिद जवळ, सांगली) यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विश्रामबाग परिसरात गर्व्हमेंट कॉलनी येथे एक कारखाना फोडण्यात आला होता. याप्रकरणी कारखान्याचे मालक सतीश बाबसाहेब शिंदे (वय ५६, रा. प्लॉट नंबर ११, बस स्टॉपजवळ गर्व्हमेंट कॉ लनी, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. या फिर्यादीनंतर विश्रामबाग पोलीसांनी तात्काळ तपास सुरू केला होता.
तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासणी केली. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी या तिघा संशयितांनी केली असल्याची माहिती तात्काळ पोलीसांना मिळाली त्यांनी त्यानुसार या तिघांचा शोध सुरू केला. यामध्ये हे तिघेजण आढळून आले. त्यानंतर तात्काळ त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी या चोरीची कबुली दिली. तसेच चोरी केलेली कॉ पर वायर व इतर चोरीचे सर्व साहित्य त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, सहाय्यक पोलीस अधिकारी चेतन माने, पोलीस उपनिरिक्षक कार्वेकर, दिनेश माने संदीप साळुंखे, अमर मोहिते, बिरोबा नरळे, महंमद मुलाणी, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी यांनी केली.








