उमेदवार प्रा. सुनिता वेरेकर यांची कैफ्ढियत
पणजी : सांखळी नगरपालिकेत अत्यंत चुरशीची लढत असलेल्या प्रभाग तीन मधील ज्येष्ठ उमेदवार तथा सांखळीच्या माजी नगराध्यक्षा प्रा. सुनिता वेरेकर यांनी या निवडणुकीत आपल्या प्रभागामध्ये सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना धमक्या दिल्या जात असल्याची कैफ्ढियत मांडली. आपल्या बारोबर जे कार्यकर्ते प्रचाराला फ्ढिरत आहेत त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. एक उमेदवार तर काही प्रभागामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची तुमच्यावर नजर असून तुम्ही नेमके मतदान कोणाला करता याची माहिती आम्हाला कळणार त्यानंतर होणाऱ्या परिणमांना सामोरे जावे लागेल अशी धमकी देत आहे. सांखळीमध्ये सायलंट मतदार योग्य निर्णय घेतील. आपण एवढी वर्षे निस्पृहपणे काम पेले आहे त्यामुळे पक्षीय राजकारण सोडा मतदार सारासार विवेक बुध्दिने मतदान करणारे आहेत व आपल्याला निवडून येण्याची खात्री आहे ,असे सुनिता वेरेकर म्हणाल्या. मुख्यमंत्री स्वत: कुठेही व कोणालाही धमकी देत नाहीत व कोणाबद्दल वाईट उद्गार देखील काढत नाहीत. परंतु ज्यांना निवडून येण्याची शक्यता नाही अशी माणसे मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करून मतदारांना धमकी देत आहेत. अर्थात या धमक्यांना हाऊसिंग बोर्डमधील मंडळी असोत वा अन्य प्रभागातील मंडळी असो काडिचीही किंमत देत नाहीत. ही लोकशाही असून जनतेने निर्भिडपणे मतदान करावे व कोणाच्याही हुकूमशाहीला बळी पडू नये, असे आपल्याला वाटते व जनतेला आपण तशी विनंती करते, असे प्रा. सुनिता वेरेकर म्हणाल्या.









