वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकावण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हरियाणातील मोहना पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी संबंधित तरूणाविरूद्ध धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ मोहना पोलीस स्टेशनच्या प्रभारींना पाठवण्यात आला असून त्यांच्याकडून संबंधित तऊणाचा शोध सुरू आहे. हरियाणामधील सोनिपत पोलिसांनी याबाबत माहिती दिली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डोक्यावर टोपी घातलेला एक तरूण पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी समोर आले तर गोळ्या घालू, असे तो सांगत आहे. व्हिडिओच्या आधारे मोहना पोलीस ठाण्यात तरूणाविरूद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.









