Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात १०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन कॉल हा बेळगाव तुरुंगातून आल्याची माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणातील कैदी गॅंगस्टर जयेश कांथानं बेळगाव तुरुंगातून नितीन गडकरींना धमकी दिल्याचं माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. याबाबत अधित माहिती घेण्यासाठी नागपूर पोलीस बेळगावला रवाना झाल्याचेही त्यांनी सांगितले.
अमितेश कुमार यावेळी म्हणाले की, गॅंगस्टर जयेश कांथा याच्याजवळ एक डायरी सापडली असून यात अनेकांचे फोन नंबर सापडले आहेत. त्याच्याकडे फोन कोठून आला याचा तपास सुरु आहे. या आरोपीला हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली असल्याचे ही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलीस, कर्नाटक पोलीस आणि नागपूर पोलीस याची चौकशी करत असल्य़ाचे त्यांनी स्पष्ट केलं.
नेमकं काय घडलं?
नितीन गडकरी यांच्या कार्यालयात शनिवारी (१४ जानेवारी) धमकीचे फोन कॉल्स आले होते. दाऊद इब्राहीम टोळीचा सदस्य असून १०० कोटी रुपये द्या अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू अशी धमकी या फोनद्वारे देण्यात आली होती. एकूण तीन निनावी फोन कॉल्सनंतर गडकरी यांचे निवासस्थान तसेच कार्यालयावरील सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत कॉल ट्रेस केला होता. हा फोन कॉल बेळगामधून आला होता, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथकही कर्नाटकमध्ये रवाना झाले होते.
कोण आहे जयेश कांथा
-कुख्यात गॅंगस्टर जयेश पुजारी सध्या हत्या प्रकरणात बेळगाव तुरुंगात आहे.
-2016 साली जेलमधून फरार,याआधीही जेलमधून अनेक धमकीचे कॉल
-मोठे अधिकारी, नेते यांना खंडणीसाठी धमकावल्याचाही आरोप
-प्रेयसीच्या सांगण्यावरुन धर्म बदलल्याची माहिती.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








