आपल्या जीवाला धोका असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी यांनी केला. या संबंधीची माहीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहून तक्रार केली आहे. राऊत यांच्या आरोपांमुळे शिंदे- ठाकरे गटातील कलहाचा नविन आध्याय सुरु होण्याची चिन्हे आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना खासदार राउत म्हणाले, “महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना गेल्या काही दिवसांपासून धमक्या देण्याचे तसेच त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असून महाराष्ट्राची ही परंपरा नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली असून त्याबद्दल माझी तक्रार नाही. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हासुद्धा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यांना मी एक गंभीर बाब निदर्शनास आणू इच्छितोव कि ठाण्यातील राजा ठाकूर नावाचा एक कुख्यात गुंड आणि त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी मुख्यमंत्र्यांचे पूत्र खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे. अशी माहीती माझ्याकडे आली आहे. त्यामुळे सध्याचे महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय गृहमंत्र्यांच्या नजरेस आणून देणे महत्वाचे आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









