ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Threat to bomb Mumbai again मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची निनावी धमकी देण्यात दिली आहे. सांताक्रूझमधील एका व्यक्तीला अज्ञाताने व्हिडिओ कॉल करुन अशाप्रकारची धमकी दिली. त्यानंतर या व्यक्तीने तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात माहिती दिली. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही मुंबईला बॉम्बने उडविण्याची अनेकदा धमकी देण्यात आली होती. महिनाभरापूर्वी एका पंचतारांकित हॉटेलला देखील बॉम्बच्या धमकीचा कॉल आला होता. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकास बेडय़ा ठोकल्या. त्यानंतर पुन्हा एका महिन्याने सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या व्यक्तीस अनोळखी व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली. सामान्य व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून अशा प्रकारे धमकी देण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. सांताक्रूझ पोलीस व्हिडिओ कॉलचे लोकेशन ट्रेस करत आहेत.
अधिक वाचा : गांधी घराण्यातील कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही