वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील उद्योग भवन आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय उडवून देण्याची धमकी मिळाल्याने शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने शुक्रवारी दुपारी उद्योग भवनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआयएसएफने मेलची चौकशी सुरू केली आहे. त्याचवेळी, हरियाणातील सचिवालयात तैनात सीआयएसएफ, हरियाणा पोलीस, चंदीगड पोलीस आणि सीआयडी यंत्रणा सतर्क झाली. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. सदर ई-मेल कोणत्या आयपी अॅड्रेसवरून पाठविण्यात आला याचा शोध सुरू आहे. यापूर्वी 27 मे रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयालाही बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती.








