ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी अज्ञाताने फोनवरून दिली आहे. जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असतानाच अशा प्रकारची धमकी मिळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोध पथकाकडून आज सकाळी रेल्वे स्थानक आणि परिसराची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, तिथे कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सामानाचीही कसून तपासणी करण्यात आली. दरम्यान, धमकीचा फोन मनमाडहून आल्याचे समोर आले आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक नाशिकला रवाना झाले आहे.
अधिक वाचा : सिकंदर, महेंद्र गायकवाड, सदगीर आणि शिवराज राक्षेची अंतिम फेरीत धडक









