चेन्नई :
चेन्नई विमानतळावरील एका आंतरराष्ट्रीय विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. तपासानंतर ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 237 प्रवाशांसह प्रवास करणाऱ्या विमानाची सुरक्षित लँडिंगनंतर तपासणी करण्यात आली. या तपासणीत काहीच संशयास्पद आढळून आले नाही. मागील काही काळापासून विमानांमध्ये बॉम्ब असल्याची खोटी धमकी देण्याचे अनेक प्रकार घडले आहेत.









