चेन्नई :
तामिळनाडूच्या वडापलानीमध्ये भगवान मुरुगन मंदिराला बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. आम्ही लवकरच मंदिरात स्फोट घडवू असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे. धमकीचा कॉल चेन्नई शहराच्या पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. धमकी मिळताच बॉम्बविरोधी पथकाने सोमवारी सकाळी मंदिर आणि परिसरात विस्तृत तपासणी केली. यानंतर कॉलद्वारे प्राप्त झालेली धमकी खोटी असल्याचे सांगण्यात आले.मुरुगन मंदिरात बॉम्ब पेरण्यात आले असून लवकरच त्यांचा स्फोट होईल, असा दावा धमकी देणाऱ्याने केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने मंदिरात धाव घेतली होती. पोलिसांच्या पथकाने श्वानासोबत मंदिर परिसरात विस्तृत पाहणी केली असता धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले.









