जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
गोकाक येथील मालदिन्नी क्रॉसजवळ आमच्या मुलाचा खून करण्यात आला. या प्रकरणी अटक झालेल्या आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यानंतर पुन्हा तो आमच्या कुटुंबीयांना धमकी देत आहे. तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गोकाक शहरातील महांतेशनगर, मालदिन्नी क्रॉस येथे मंजू मुरकीभांवी याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी सिद्धाप्पा बबली याला अटक करण्यात आली होती. मात्र आता त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तो गुन्हा मागे घ्या अन्यथा तुम्हाला व तुमच्या मुलाला संपवून टाकू, अशी धमकी दिली आहे. यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी शंकर बसवाणी मुरकीभांवी, लक्ष्मण बसवाणी मुरकीभांवी, नागाप्पा बसवाणी मुरकीभांवी, विठ्ठल शंकर मुरकीभांवी, सिद्धव्वा शिवानंद कुरी, रेणुका पंडित कडकोळ यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.









