Gram Panchayat Election 2022 Sangli News : बीड जिल्ह्यातील प्रवासासाठी मिरज एसटी आगारातून एसटी गाड्या उपलब्ध नसल्याने शनिवारी रात्री उशिरापर्यंत हजारो प्रवासी एसटी स्थानकावर अडकून राहिले. एसटी आगार व्यवस्थापनाने एकही गाडी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून हात झटकल्याने प्रवासी संतप्त झाले. दिसेल त्या एसटी गाड्यांमध्ये घुसखोरी करून बीड जिल्ह्यात सोडण्याची विनंती करण्यात येत होती. प्रशासनाच्या विरोधात अन्य मार्गावरील एसटी गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. अखेर पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केल्यामुळे अडवून ठेवलेल्या गाड्या सोडण्यात आल्या. या प्रकारामुळे मिरज एसटी स्थानकावर एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान एसटी आगार प्रमुखांनी माध्यमांचा फोनही स्वीकारला नाही. रात्री उशिरापर्यंत दोन गाड्या सोडण्याचे नियोजन सुरू असल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले.
निवडणुकीसाठी तसेच अन्य कामासाठी सांगली जिल्ह्यातील ऊस कामगार मजूर बीड जिल्ह्याकडे जाण्यासाठी मिरज एसटी स्थानकावर दुपारपासून दाखल होऊ लागले होते. यामध्ये शेकडो ऊस कामगार मजूरांचा समावेश आहे. मात्र दुपारपासून सायंकाळी उशीर पर्यंत एकही एसटी आली नाही. रात्री नऊ नंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला. रस्त्यात दिसेल ते एसटी अडवून प्रवाशांनी घुसखोरी सुरू केली. त्यामुळे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. अनेक एसटी गाडी अडवून धरण्यात आल्या. बीड जिल्ह्यासाठी गाडी उपलब्ध करा अन्यथा एसटी सेवा बंद करा अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली. यामुळे एसटी आगार प्रशासनाची धावपळ उडाली.
हेही वाचा- Satara News : ट्रक्टरची टाकी फुटून आगीचा भडका ,चालक गंभीर जखमी
एसटी गाड्यांची कमतरता तसेच ड्रायव्हर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून बीड मार्गावर जादा गाड्या सोडण्यासंदर्भात आगार प्रशासनाकडून नकार दिला. त्यामुळे प्रवासी आणखीन संतप्त झाले. एसटीचे प्रतीक्षा करत रात्रभर ताटकळत बसण्याची वेळ प्रवाशांवर आली. त्यामुळे गोंधळून गेलेल्या प्रवाशांनी अन्य एसटी गाड्यांमध्ये घुसखोरी सुरू केली. त्यामुळे पोलिसांना पाचारण करून प्रवाशांना हटविण्यात आले. व अडवून धरलेल्या एसटी सोडून दिल्या. रात्री उशिराने बीड मार्गावर दोन जागा गाड्या सोडण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे शेकडो प्रवासी एसटी स्थानकावर ताटकळत थांबल्याचे चित्र होते
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








