कोल्हापूर :
सौंदती डोंगरावर 12 ते 14 डिसेंबर या कालावधीत रेणुकादेवीची यात्रा होणार आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरातील मानाचे चार जग सौंदती डोंगरावर गेले आहेत. तर बुधवारी रात्री शहरातील मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, राजारामपुरी आदी भागाबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सुमारे 100 एसटी बस व खासगी गाड्यांमधून हजारो भाविक सौंदतीला रवाना झाले. भंडाऱ्याची उधळण उद् ग आई उद्च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. आज (दि. 12) सकाळी जोगनभावी कुंडावर लिंब नेसण्याचा विधी झाल्यानंतर भाविक सौंदती डोंगरावर जाणार आहेत.
सौंदती डोंगराला जाणाऱ्या भक्तांची संख्या प्रचंड आहे. बुधवारी रात्री 100 एसटी बस व खासगी गाड्या सौंदतीला रवाना झाल्या आहेत. कोल्हापुरातील रेणुका भक्त सौंदती डोंगरावर गुरूवार व शुक्रवार मुक्काम करणार आहेत. कर्नाटक शासनाने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दोन दिवसाच्या मुक्कामात विविध धार्मिक विधी होणार आहेत. शनिवारी रेणुकादेवीची पालखी जमदग्नी ऋषीच्या मंदिराला भेट देऊनप् ाgन्हा रेणुका मंदिरात येणार आहे. त्यानंतर रेणुकाभक्तांचा कोल्हापूरकडे परतीचा प्रवास सुरू होईल.
उदं गं आई उदं च्या जयघोषात भाविक डोंगराकडे रवाना
कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त मंडळ, मंगळवार पेठेतील ताईबाई गल्ली रेणुका भक्त मंडळ, व्हीनस कॉर्नर रेणुका भक्त मंडळ यांच्यासह शहरातील आणि ग्रामीण भागातील हजारो रेणुका भक्त उदं गं आई उदं च्या जयघोषात सौंदती डोंगराकडे रवाना झाले. यावेळी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.
17 रोजी टेंबलाई यात्रा, 21 रोजी ओढ्यावरची आंबिल
शहरातील मानाचे चार जग सोमवार 16 डिसेंबरला कोल्हापुरात दाखल होणार आहेत. सौंदतीला जाताना सुखाने जाऊन येऊ दे असे नवस टेंबलाई देवीला केलेले असते. त्यामुळे मंगळवार 17 डिसेंबरला टेंबलाई देवीची यात्रा होणार आहेत. त्यानंतर 21 डिसेंबरला ओढ्यावरची आंबिल यात्रा होणार आहे.
सौंदतीला जाणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसाद
गेल्या 23 वर्षापासून मालोजीराजे छत्रपती यांच्या वतीने सौंदती यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या रेणुका भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. आज (दि. 12) रोजी सकाळी 9 वाजल्यापासून कर्नाटक राज्यातील घटप्रभा (तलाव) येथे महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. तरी रेणुका भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती यांच्या वतीने करण्यात आले आहे.








