प्रतिनिधी,कोल्हापूर
गगनबावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यात प्रतिटनामागे राजरोस दोनशे किलो ऊसाची चोरी केली जाते. याऊलट राजाराम कारखान्याच्या काट्यावर केलेले वजन अचूक असते, याचा प्रत्यय कारखान्याच्या सभासदांना आला आहे. त्यामुळे प्रतिटन दोनशे किलो उसाची चोरी करणाऱ्यांनी राजाराम कारखान्याच्या काट्यावर बोलू नये, असा टोला कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी विरोधकांना लगावला.
राजाराम कारखाना निवडणुक प्रचारातंर्गत मंगळवारी माजी आमदार अमल महाडिक यांनी राधानगरी तालुक्यातली धामोड परिसराचा दौरा केला. यावेळी येथील सभासदांशी संवाद साधताना माजी अध्यक्ष पाटील बोलत होते.
माजी अध्यक्ष पाटील म्हणाले, गगनबावड्याच्या डी वाय कारखान्यात टनामागे 200 किलो उसाची राजरोसपणे चोरी होते. अनेक ट्रॅक्टर चालक याबाबत खाजगीत बोलत असतात. पण येथे हुकुमशाहीचा कारभार असल्याने विचारणार कोण म्हणून ऊस पुरवठा करणारे शेतकरी गप्प आहेत. याउलट राजाराम कारखान्याच्या काट्यावर केलेले वजन बिनचूक येते, याचा प्रत्यय सभासदांना आला असल्यामुळे दरवर्षी कारखान्याला सभासद जास्तीत जास्त ऊस घालत असतात. जे गगनबावड्यात घडतय ते कसबा बावड्यात होऊ देणार नाही असा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, जमिनी लाटणाऱ्यांनी आणि डोनेशनच्या पैशावर गब्बर बनलेल्यांनी महाडिकांवर बोलू नये. शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर तुमच्या कॉलेजमध्ये शेतकऱ्याच्या पोराला डोनेशन न घेता आणि कमीत कमी फी मध्ये प्रवेश द्या असा उपरोधिक सल्लाही पाटील यांनी दिला.
माजी आमदार अमल महाडिक यांनी ज्यांनी तुमचे सभासदत्व रद्द करण्याचा घाट घातला असे लोक आता निवडणुकीच्या तोंडावर तुमचे पाय धरायला येत आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन केले. यावेळी जयसिंग खामकर, के.पी.चरापले, सदाशिव कोरे, विश्वास बिडकर, मारुती पाटील, पंकज पाटील, मारुती नलवडे, सुभाष गुरव यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









