अभिनेत्याकरता आजाराचा वाढतोय धोका
हॉलिवूडचे चित्रपट ‘थॉर’ आणि ‘अव्हेंजर्स’ सीरिजमध्ये दिसून आलेला लोकप्रिय अभिनेता क्रिस हेम्सवर्थच्या चाहत्यांची निराशा करणारे वृत्त आहे. क्रिस हेम्सवर्थ चित्रपटसृष्टीतून बेक घेणार असून यामागे आजार कारणीभूत आहे. क्रिस हेम्सवर्थनेच यासंबंधी माहिती दिली आहे. माझ्यात यापूर्वीच अल्झायमरची लक्षणे दिसून आली असून ती आनुवांशिक असल्याचे त्याने सांगितले आहे.
क्रिस हेम्सवर्थ हॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने स्वतःच्या अभिनयाद्वारे चाहत्यांना वेड लावले आहे. माझ्यामध्ये अल्झायमर्सची लक्षणे दिसून आली आहेत. 10 वर्षांपूर्वीच मला याचे संकेत दिसू लागले होते, परंतु यापूर्वी याकरता स्वतःचे काम सोडले नव्हते असे क्रिसने म्हटले आहे.
क्रिसमध्ये दोन्ही पालकांकडून एपीओई4 जीनच्या दोन कॉपी आहेत, या कॉम्बिनेशनमुळे अल्झायमर्सची जोखीम वाढते. काही काळासाठी ब्रेक घेण्याचा विचार मी केला आहे. यापूर्वी केलेल्या करारांनुसार स्वतःची कामे पूर्ण करणार आहेत. पुढील काळात घरातच शांततेत वेळ घालणार आहे. मुले आणि पत्नीसोबत वेळ घालविण्यावर भर देणार असल्याचे क्रिसने म्हटले आहे.