वृत्तसंस्था / म्युनिच
जर्मनीतील लीग फुटबॉल स्पर्धेत नेहमीच दर्जेदार कामगिरी करणाऱ्या बायर्न म्युनिच फुटबॉल क्लबचा हुकमी फुटबॉलपटू जर्मनीचा थॉमस मुल्लेर आता तब्बल 25 वर्षानंतर या क्लबला निरोप देणार आहे.
35 वर्षीय मुल्लेरचे बायर्न म्युनिच क्लबबरोबरचा करार चालु वर्षाच्या फुटबॉल हंगामाअखेर संपुष्टात येणार आहे. मुल्लेरने आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर बायर्न म्युनिच संघाला 12 वेळा बुंदेसलीगा फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद तसेच दोनवेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून दिले आहे.बायर्न म्युनिच संघातील मुल्लेर हा अनुभवी ज्येष्ठ आणि हुकमी फुटबॉलपटू म्हणून गणला गेला आहे. 2008 साली क्लिन्समनच्या मार्गदर्शनाखाली मुल्लेरने बायर्न म्युनिच संघात प्रवेश केला होता.त्याने क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत 743 सामन्यात 247 गोल नोंदविले आहेत.









