प्रतिनिधी /म्हापसा
मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान थिवी आंब्यानी येथे झालेल्या मारुती ओमनी आणि ऍक्टीव्हा स्कूटर यांच्यामधील अपघातात ऍक्टीव्हा चालक सौ. श्रीविधा संदेश सावंत (38) रा. आराडी क्रूझवाडा साळगाव ही जागीच ठार झाली. तिला त्वरित म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले मात्र डय़ुटीवरील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याबाबत कोलवाळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंब्यानी थिवी येथे सकाळी 8.47 वाजण्याच्या दरम्यान राहुल आनंद सावंत (23) रा. घाटेश्वरनगर खोर्ली म्हापसा हा ओमनी कार जीए-01-आर-3563 ने अतिवेगाने थिवी ते मांगिरीश कॉलनी थिवी येथे आला आणि वळणावर एकेरी मार्गात घुसून ऍक्टीव्हा स्कूटर जीए-03-एएन-2698 ने श्रीविधा जात असता तिला ठोकर दिली असता तिच्या डोक्याला जबर मार लागून ती गंभीर रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. उपचारासाठी तिला त्वरित जिल्हा आझिलो इस्पितळात दाखल केले असता डय़ुटीवरील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार परब यांनी घटनेचा पंचनामा केला. संशयित ओमनी कार चालक राहुल सावंत याला पोलिसांनी अटक केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवून देण्यात आला.









