कोल्हापूर / इम्रान गवंडी :
यंदाही राज्य पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकांच्या शाळांनी आपला दबदबा कायम राखला आहे. राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत एकाच शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी येण्याचा बहुमान महापालिकेच्या जरग विद्यामंदिरने मिळवला आहे.
महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरातील राज्यस्तारावर 8 तर जिल्हास्तरावर 44 विद्यार्थी चमकले आहेत. सर्वाधिक विद्यार्थी येणारी राज्यातील एकमेव शाळा ठरली आहे. त्याचबरोबर शिवाजी पेठेतील मनपा पी. बी. साळुंखे विद्यालयातील समृद्धी खुडे हिने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवत महापालिका शाळांची गुणवत्ता सिद्ध केली आहे. केवळ शिक्षकांकडून घेतला जाणारा अभ्यास जोडीला विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने केलेल्या सरावाच्या जोरावर राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत चमक दाखवली आहे.
शाळेतील शिष्यवृत्ती सराव चाचण्या, जादा तास, शाळा स्तरावर शिष्यवृत्तीच्या धर्तीवर मॉडेल पेपर, म.न.पा. शिष्यवृत्ती पॅटर्न पुस्तिकेचा वापर करुन विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेणेत येतो अशा विविध उपक्रमामूळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व गुणवत्ता यादीत आपला डंका पिटला आहे. राज्य गुणवत्ता यादीत 10 तर जिल्हा गुणवत्ता यादीत 72 विद्यार्थ्यांची असे एकूण 82 विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
- राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
मनपा श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर : स्वरा अरुण पाटील (96 टक्के पाचवा क्रमांक), अद्वैत दिलीप पोवार (96 टक्के पाचवा क्रमांक), संस्कार शहाजी पाटील (94.66 टक्के सहावा क्रमांक), मधूरिमा भरतकुमार जाधव (94.66 टक्के सहावा क्रमांक), उत्कर्ष राजाराम प्रभूखानोलकर (92.66 टक्के अकरावा क्रमांक), शौर्य विशाल जाधव (92 टक्के बारावा क्रमांक), काव्या विशाल घोटणे (92 बारावा क्रमांक़), विराज सुनिल पवार (92़ टक्के बारावा क्रमांक), पीएमश्री महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी रौनक उत्तम वाईगडे (93.33 टक्के नववा क्रमांक), ज्ञानदा दिपक चौगले (91.33 टक्के चौदावा क्रमांक)
- एकूण विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश
शाळेचे नाव राज्य जिल्हा
श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर 8 44
महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी 2 7
टेंबलाईवाडी विद्यामंदिर 0 5
नेहरुनगर विद्यामंदिर 0 4
प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर बावडा 0 4
भाऊसो महागांवकर विद्यालय 0 1
आण्णासो शिंदे विद्यामंदिर 0 1
पी. बी. साळुंखे विद्यामंदिर 0 1
जाधववाडी विद्यामंदिर 4
राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूल 0 1
एकूण 10 72
- नाविण्यपुर्ण उपक्रमामुळे यश
दरवर्षी शिष्यवृती परिक्षेचा सराव घेण्यासाठी शिक्षण नेहमी प्रयत्नशिल असतात. प्राथमिक शिक्षण समितीकडूनही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले जातात. राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत यश मिळवत महापालिकांच्या शाळांनी गरूड भरारी घेतली आहे.
-डी. सी. कुंभार, प्रशासनाधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण समिती








