मुंबईतील पावसाने अगदी आता पर्यंत तोंडचे पाणी पळवले होते. कारण मुंबई शहराला पावसाची गरज असते ती तहान भागविण्या इतपत मर्यादित. मुंबईकरांच्या कवी मनाने कितीही ओढ घेतली तरीही पाणी पुरवठा करणारी धरण समाधानकारक भरली नसल्यास ‘एकदाचा वर्षाव कर’ असच तोंडातून निघते. आता धरण 98 टक्के भरली असतानाच मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मुंबईला पावसाने यंदा जेमतेम साथ दिली असताना राज्यात मात्र तुरळक ठिकाणी गंभीर स्थिती असल्याचे चित्र आहे.
मुंबईत 1 जून ते 16 सप्टेंबरपर्यंत उपनगरात 38 तर शहरांत 40 दिवस पाऊस पडला. त्याच वेळी या कालावधीत शहरात 2079.10 तर उपनगरात 2767.40 मिमी एवढा पाऊस झाला. दरम्यान शहरातील पावसाची सरासरी 2310 तर उपनगरातील सरासरी 2784 मिमी एवढी असते. म्हणजेच आता पर्यंतच्या आकडेवारीवरून किंचीत कमी टक्केवारी दिसून येते. शहरांत 90 टक्के तर उपनगरात 99.40 टक्के पाऊस झाला. यंदा पावसाळ्यात अंधेरी सबवेतील पाणी तुंबण्याचे दोन तीन प्रसंग वगळता मुंबईत लोकल खोळंबा किंवा वाहतूक कोंडी तसेच सखल भागात साचणे असे प्रमाणातच दिसले. कारण पाऊस कमी झाला. मफग नक्षत्र म्हणजे 7 जूनपासून मुंबईत पावसाचे वातावरण तयार झाले असले तरी जुलै महिन्यातील दुसरा आठवडा वगळता उर्वरित कालावधीत मुंबईकरांनी पाऊस अनुभवला नाही. जुलै महिन्यातील त्या पंधरावड्याच्या कालावधीत पडलेल्या पावसाने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य धरणाव्यतिरिक्त इतर धरण भरून वाहू लागली. त्यावेळी मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली अशी वफत्त प्रसारित करण्यात आली होती. त्यावेळी महापालिकेला प्रमुख धरण भरली नसल्याचे सांगत प्रसिद्धी द्यावी लागली. याचा गर्भीत अर्थ पाऊस समाधाकारक नाही असा होतो. तेव्हापासून पाऊस थेंबाथेंबाने व्हावा आणि धरण टक्क्याटक्क्याने भरावीत याकडे लक्ष दिले जात होते. मुंबईतील पावसाची सिजनल आणि वार्षिक सरासरी पाहिल्यास यंदा ती कमी टक्केवारी दिसून येते. गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये मुंबईने सिजनल सरासरी ओलांडली होती. मुंबईची पावसाची तीव्रता मोजताना मुसळधार, अतिमुसळधार ते अति अतिमुसळधार अशी मोजली जाते. 65 ते 125 मिमी पाऊस झाल्यास मुसळधार झाल्याचे बोलले जाते. तर 125 ते 244 मिमी पाऊस झाल्यास अतिमुसळधार म्हटले जाते. तर 244 मिमीपेक्षा अधिक झाल्यास अति अतिमुसळधार प्रकारात पाऊस मोडतो. यंदा मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचे दिवस किरकोळ प्रमाणात अनुभवले. कमी कालावधीत अधिक मिलीमीटर पाऊस झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. यातून रस्ते वाहतूक किंवा लोकल वाहतुकीला त्रास होतो. मात्र थांबून थांबून अधिक मिलीमीटर पाऊस झाल्यास त्रास होत नाही . दरम्यान पावसाचा मुंबईला त्रास होण्याची इतरही कारणे आहेतच. आता पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज करताना हवामानशास्त्र विभागाने मुंबईला 16 ते 18 सप्टेंबर या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला होता. राज्यात मुंबईसह पालघर, ठाणे, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता वर्तविली. तर 19 आणि 20 सप्टेंबरला राज्यात विविध ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता सांगत या दोन दिवसांमध्ये रत्नागिरी आणि रायगडमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. वातावरणीय प्रणाली मार्गबदलातून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाचे निवफत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी केला आहे. सध्याची ‘कमी दाब क्षेत्र’ प्रणाली पूर्व मध्य प्रदेशातून वक्रकार मार्गाने गुजरातमध्ये उतरण्याच्या शक्यतेमुळे सध्या मध्य प्रदेशमध्ये जोरदार पाऊस होत असून तेथे नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. तर येत्या दोन दिवसांत गुजरातमध्येही पावसाची तीव्रता अशीच वाढू शकते. वातावरणीय प्रणाली बदलातून, सप्टेंबर 16 ते 19 दरम्यानच्या 4 दिवसांत महाराष्ट्रात अपेक्षित असलेल्या मध्यम ते जोरदार पावसाची तीव्रता यामुळेच कमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र मुंबईसह उत्तर कोकणात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम असून उर्वरित महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, जालना. बीड, परभणी हिंगोली, नांदेड व उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांत पुढील 7 दिवसांत(23 सप्टेंबरपर्यंत) केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवू लागली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत पुढील 7 दिवसांत (23 सप्टेंबरपर्यंत) तर पावसाची शक्यता फारच कमी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात शहर ते खेड्यात सर्व पातळ्यावर पावसाची गरज असल्याने मान्सून अंदाजाकडे सर्वांचेच लक्ष असते.
सुऊवातीला फक्त पिण्यासाठी आणि शेतीसाठी व्यक्त करण्यात येणारा पावसाचा अंदाज आता विमानो•ाण विभाग, पर्यावरण विभाग ते अगदी पर्यटन विभागासाठीही महत्त्वाचा झाला आहे. शहरांत पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी पावसाचा अंदाज घेतला जातो. तर गावखेड्यात शेतीसाठी. त्यामुळे मान्सून अंदाज सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय झाला आहे. वेधशाळेने अंदाज व्यक्त कऊन पाऊस न झाल्यास पाऊस आनंदावर विरजण पडते. त्यातून वेधशाळेवर टीका होत असते. यंदा मात्र मान्सून ओढ खाणार असाच अंदाज होता. त्यामुळेच पाऊस अंदाजाचे गणित समजून घेताना हवामान विभागाकडून अधिक लोक जागरूकतेची अपेक्षा केली जात असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
राम खांदारे








