पणजी : या वर्षी पहिल्यांदाच पर्वरीत कार्निव्हल होणार असल्याची माहिती पर्वरी कार्निव्हल समितीचे अध्यक्ष व पॅन्हा द फ्रान्स पंचायतीचे सरपंच स्वप्नील चोडणकर यांनी दिली आहे. 17 फेब्रूवारी रोजी पर्वरीत कार्निव्हल होणार असल्याने पर्वरीतूनच कार्निव्हलची सुऊवात होणार आहे. पर्वरीचे आमदार तथा राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खवटे यांनी हा मान पर्वरीकरांना दिला असल्याने पर्वरी मतदार संघातर्फे त्यांचे आभार मानीत असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर गोवा खासदार तथा केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित रहातील. त्यांच्या सोबत राज्यातील अन्य मंत्री तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित रहातील असे चोडणकर यांनी सांगितले. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वप्नील चोडणकर बोलत होते. यावेळी त्यांच्या जील्हा पंचायत सदस्य कवीता नाईक, सर्वेश हळर्णकर, सराफ फडते, मारीना मोरासे, अनुज हरमलकर, संदीप साळगावकर, नारायण नाईक, विजय दळवी, रवी नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पहिल्यांदाच कार्निव्हल होत असल्याने लोकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्वरी कार्निव्हल समिती तर्फे उत्कृष्ठ आयोजन करण्याचा प्रयत्न होणार आहे. असे अनुज हरमलकर यांनी सांगितले. दरवर्षी प्रमाणेच इतर ठिकाण जशी चित्ररथ मिरवणूक होते त्याच पध्दतीने पर्वरीत चित्ररथ मिरवणूक होणार आहे. मरवणूकी दरम्यान विविध विभागात स्पर्धा होणार असून त्याला आकर्षक बक्षिसे दिली जातील. दर वर्षी चित्ररथ मिरवणूकीत जे संघ सहभागी होतात त्या सर्व संघाना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक संघ चित्ररथ मिरवणूकीत सहभागी होतील अशी अपेक्षा आम्ही करीत आहोत. पर्वरी येथील मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या सर्व्हीस रोडवर कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक होणार आहे. पर्वरी येथे असलेल्या शिक्षण संचालनालयाच्या इमारीतीकडून चित्ररथ मिरवणूक दुपारी 3.30 वाजता सुऊ होणार आहे ती संध्याकाळी 6.30 ते 7 पर्यंत अॅकडील स्कूलपर्यंत येऊन थांबणार नंतर सांस्कजतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठरलेल्या वेळेत कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. असेही अनुज हरमलकर यांनी सांगितले.









