कोल्हापूर :
गेल्या वर्षीच्या उन्हाळात 2 हजार 564 इतक्या टॅकरने लोकांना पाणीपुरवठा केला जात होता. पण गेल्या वर्षापेक्षा यंदा राज्यात तापमानाचा पारा वाढलेला असला, तरीदेखील राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा अधिक व समाधानकारक असल्याने, सध्या राज्यात 796 इतक्या टॅकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. तरीसुध्दा राज्य सरकारने जलसंपदा विभागाला वाढत्या उन्हाळाची दाहकता लक्षात घेवून, लोकांना पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याबाबत आदेश दिला आहे.
गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्र जाणवू लागल्या आहे. अशावेळी पाणी अत्यंत महत्वाची गरज असते. गेल्या वर्षापेक्षा यंदा राज्यातील मोठ्या धरणात पाण्याचा साठा समाधानकारक असल्यामुळे, राज्यातील 18 जिह्यांतील 644 गावे व 2051 वाड्यांना 796 टॅकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. याचदिवशी गेल्या वर्षी राज्यात 2 हजार 564 इतक्या टॅकरव्दारे लोकांना पाणीपुरवठा केला जात होता.
- छत्रपती संभाजीनगर महसुल विभागात सर्वाधिक टॅकर
यंदा राज्याच्या छत्रपती संभाजीनगर महसुल विभागात सर्वाधिक म्हणजे 275 टॅकरने लोकांना पाणी पुरवठा केला जात आहे. 275 पैकी 192 टॅकर हे छत्रपती संभाजीनगर जिह्यात सुऊ आहेत. पाणी टंचाईग्रस्त गावामधील लोकांना पुरेश पाणी पुरवठा व्हावा. यासाठी नियोजनबध्द पाणीपुरवठा करण्याविषयी राज्य सरकारने जलसंपदा विभागाला आदेश दिला आहे.
- राज्यातील धरणातील सद्यस्थितीतील पाणीसाठा
मोठी धरणात – 10 हजार 401 दलघमी
मध्यम धरणात – 2 हजार 572 दलघमी
लघू धरणात – 1 हजार 101 दलघमी








