सावंतवाडी / प्रतिनिधी
कैलास पती नावाच्या वृक्षाचे फुल वेधतंय साऱ्यांचे लक्ष !
सावंतवाडी शहरात कैलास पती हा दुर्मिळ वृक्ष पाहावयास मिळतो . राजवाडा लस्टर गेट कडून सबनीस वाड्याकडील जाणाऱ्या रस्त्यावरती हा दुर्मिळ वृक्ष आहे . या वृक्षाच्या फुलाची रचना आकर्षक असून ते फुल लक्ष वेधून घेतंय . तसेच या फुलाचा सुगंध सुंदर आहे . फोटोग्राफर रोशन सापळे यांनी वरील छायाचित्र टिपलं आहे. याच जातीचे वृक्ष वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र येथे बघायला मिळतात . तसेच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या परिसरात हा वृक्ष आहे अशी माहिती मिळतेय . महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व . यशवंतराव चव्हाण यांनी हा वृक्ष तेव्हा लावला होता .









