कंपनीच्या बैठकीमध्ये सदरचा प्लॅन रद्द
वृत्तसंस्था/मुंबई
दूरसंचार क्षेत्रातील दोन कंपन्यांनी आपला जुना प्लॅन नुकताच बंद केला आहे. टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलने हल्लीच त्यांचा 249 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद करण्याचे ठरवले आहे. याआधी रिलायन्स जिओ यांनीही अशाच प्रकारे हा प्लॅन बंद केला होता. भारती एअरटेलच्या ग्राहकांना आता 299 चा प्रीपेड प्लॅन घेण्याचा पर्याय असणार आहे. एअरटेल सदरच्या 249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1 जीबी डाटा 28 दिवसांसाठी पुरवत होती. यामध्ये 100 एसएमएस दिवसाला आणि कॉलचा समावेश होता. कंपनीच्या बैठकीमध्ये सदरचा प्लॅन रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतातील डाटा सेवांचे शुल्क हे खूपच कमी आहेत. यामुळे आगामी काळात कंपनीच्या महसुलात वाढ होणार आहे. याचदरम्यान जेफरीज या संस्थेने भारती एअरटेलच्या समभागाबाबत वाढीची शक्यता वर्तवली आहे. येणाऱ्या काळात एअरटेलचा समभाग 31 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असा अंदाजही संस्थेने वर्तवला. 249 चा प्लीन रद्द केल्याच्या बातमीचा परिणाम बुधवारी समभागावर दिसला, समभाग 2 टक्के घसरत इंट्राडेत 1951 ऊपयांवर आला होता.









