दिवाळीतही पावसाचा धमाका, हंगामात देशभरात 108 टक्के पावसाची नोंद, परतीचा पाऊसही लांबणार
पुणे / प्रतिनिधी
नैत्य मोसमी पावसाचा यंदाचा हंगाम अधिकृतरित्या संपला असून, जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरीच्या विक्रमी 108 टक्के पाऊस बरसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय मोहोपात्र यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परतीचा मान्सून आठवडाभर रखडणार आहे तसेच ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या अधिकचा पाऊस आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
यंदा मोसमी वारे वेळे आधीच 13 मे रोजी अंदमान, 24 मे केरळमध्ये दाखल झाले. 29 जूनला त्याने पूर्ण देश व्यापला. त्यापूर्वी मे महिन्यात पूर्वमोसमी पावसाने देखील देशाला झोडपून काढले होते. यावषी जून महिन्यात सरासरीच्या 109, जुलै ऑगस्ट महिन्यात 105, तर सप्टेंबर महिन्यात 115 टक्के पाऊस बरसला. 2001 पासूनच पाचवा विक्रमी, तर 1901 नंतरचा 38 वा सर्वाधिक पावसाचे वर्ष ठरले आहे. बिहार, आसाम, मेघालय तसेच अऊणाचल प्रदेश या राज्यात यंदा तुटीचा पाऊस नोंदविण्यात आला आहे, तर राजस्थानमध्ये अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. याशिवाय जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदिगड, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा, उत्तर कर्नाटक या भागात अतिरिक्त पाऊस पडला आहे.
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात धो धो
महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटक राज्यातदेखील यंदाच्या हंगामात दमदार पाऊस नोंदविण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाची तीव्रता अधिक राहिली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे.
परतीचा पाऊस रखडला
परतीच्या पावसाला राजस्थान मधून 14 सप्टेंबरला सुऊवात झाली आहे. सद्या तो गुजरात, मध्य प्रदेश तसेच पश्चिम उत्तर प्रदेशपर्यंत येऊन पोहचला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी निर्माण होणार असून, ते ओरिसा, आंध्र किनारपट्टी पार करीत पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. यामुळे पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार आहे. या क्षेत्रामुळे परतीचा मान्सून रेंगाळला असून, आठवडाभर त्याला ब्र्रेक मिळणार आहे. त्यामुळे ईशान्य मोसमी पाऊसदेखील उशिरा आगमन करण्याची शक्मयता डॉ. मोहोपात्रा यांनी वर्तविली आहे.
ला निनोचा शक्मयता 70 टक्के
थंडीच्या हंगामात ला निनोचा शक्मयता 70 टक्क्यांनी अधिक आहे. यामुळे थंडी अधिक कडक राहण्याची शक्मयता वर्तविली जात असली, तरी थंडीवर इतर अनेक घटक प्रभाव टाकत आहेत. आणखी थोड्या कालावधीनंतर यावर भाष्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ऑक्टोबरमध्ये पाऊस
राज्याच्या अनेक भागात ऑक्टोबर महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशात पाऊस वाढणार आहे. या महिन्यात किमान तापमान सरासरीच्या अधिक, तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.








