चर्चमध्ये सर्वत्र पाणी असताना पार पडला सोहळा
फिलिपाईन्समध्ये आलेल्या विफा वादळामुळे झालेल्या अतिवृष्टीनंतर बुलाकान प्रांतात पूर आला, यामुळे एक चर्चमध्ये पाणी भरले. चर्चमध्ये पाणी भरल्यावरही जे रिक वर्दिलो आणि जमैका एगुइलर यांनी स्वत:चा विवाहसोहळा जारी ठेवण्याचा निर्णय घेतला.
विवाहाचे विधी दोघांनी गुडघाभर पाण्यात उभे राहून पार पाडले आहेत. प्रत्येक विवाहात काही आव्हाने असतात आणि या विवाहात कदाचित पूराचे पाणी आव्हान होते. जेड रिक वर्दिलो आणि जमैका एगुइलर या दोघांनीही या आव्हानाला सामोरे जात स्वत:चा विवाह पार पाडला आहे. जेड रिक वर्दिलो आणि जमैका एगुइलर 10 वर्षांपासून एकत्र आहेत. ही एक केवळ एक परीक्षा आहे, आव्हाने संपत नाहीत असे मला वाटते. हे देखील एक आव्हान असून जे आम्ही पार केले असल्याचे जेड रिक वर्दिलोने म्हटले आहे. या पूरग्रस्त बारसोआइन चर्चमध्ये पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात पाहुणे देखील पाण्यात उभे राहून सामील झाले. बुलाकान प्रांतातील मालोलोसमध्ये बारासोइन चर्चमधील हा सोहळा आता जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.









