कोल्हापूर प्रतिनिधी
अंगाची लाही लाही करत अगदी अस्वस्थ कऊन सोडणाऱ्या उष्मा सहन करत दर्शनासाठी अंबाबाई मंदिरात येणाऱ्या लहानथोर भाविकांना आता थोडा दिलासा मिळत आहे. त्यामुळे आधी पायाला चटके मगच अंबाबाईचे दर्शन हा प्रकारही आता थांबला आहे. मंदिराच्या चारही दरवाजा समोरील मार्गातील पेव्हिंग ब्लॉकवर पायांना दिलासा मिळवून देणारा कुलकोट केला आहे. मुक्त सैनिक वसाहत परिसरातील क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने हा कुलकोट करण्यात आला आहे. 6 ते 8 फुट ऊंद असलेल्या या कुलकोट वऊन एकाचवेळी जास्तीत जास्त भाविक मंदिरात जात आहेत. त्यांना उष्माची तिव्रता फारच कमी जाणवत आहे.
गेल्या पावणे दोन महिन्यांपासून बेजार करणारा उन्हाचा तडाखा बसत आहे. या तडाख्यातून भाविकांचे संरक्षण करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिराभोवती काडपी मंडप उभारला. त्यामुळे मंदिराच्या चारही दरवाजातून अंबाबाई मंदिरात येणाऱ्या आणि देवीच्या दर्शनानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालणाऱ्या भाविकांचे उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण झाले. मंदिराच्या चारही दरवाजासमोरील मार्गात पेव्हिंग ब्लॉक उन्हाच्या तडाख्याने खूप तापत होते. दिवसभर तापत राहणाऱ्या या पेव्हिंग ब्लॉकवऊन चालताना सहन होणार नाहीत, इतके चटके बसत होते. लहान व वयस्कर भाविक तर या तापलेल्या पेव्हिंग ब्लॉकवरून चालूच शकत नव्हते. त्याची दखल घेऊन क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या परवानगीने अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाजासमोर रस्त्यांवरील पेव्हिंग ब्लॉकवर कुलकोट कऊन देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानुसार क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने स्वखर्चातून कुलकोट कऊन दिले आहेत.









