कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
नमस्कार … मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय तुम्ही माझ्या अधिकाऱ्यांना तपासामध्ये सहकार्य का करत नाही अशी विचारणा करुन पाडेकर कुटूंबियांना 7 कोटी 86 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. पाडेकर यांना फसविणाऱ्या ठकसेनांनी आठ दिवस त्यांच्याशी संभाषण करुन मगच भीती दाखवली… आणि यानंतरच टप्प्याटप्प्याने रक्कम खात्यावर वर्ग करुन घेतल्याचे समोर आले आहे.
पाडेकर यांना 7 कोटी 86 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठकसेनांनी त्यांना आठ दिवस बोलण्यात गुंतविले. यानंतर पाडेकर यांना फसवणुकीचा संशय आल्यानंतर विश्वास नांगरे – पाटील यांच्या नावाने फोन केला. पहिले 5 ते 6 दिवस केवळ गप्पा मारुन पाडेकर दांम्पत्याची चौकशी केली.
तुम्ही ज्येष्ठ नागरीक आहे. तुमची व्हॉट्सअॅपवरुन चौकशी करु, तुम्ही या खटल्यात निर्दोष आहात. सिक्युरीटी म्हणून तुमची रक्कम ठेवून 48 तासांमध्ये ती परत करतो अशा भूलथापा मारुन चार ते पाच जणांनी विविध मोबाईल नंबरच्या आधारे फोन करुन विश्वास संपादन केला. तसेच मुंबई पोलीस, सर्वोच्च न्यायालय, एनआयए याचसह सक्तवसुली संचलनालय यांची भितीही घातली.
- तुम्हाला आम्ही फसवणार नाही…
दत्तात्रय पाडेकर यांनी दोन महिन्यापूर्वी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या फसवणुकीच्या बातम्यांची कात्रणे फसवणूक करणाऱ्यांना पाठविली होती. आमची अशी फसवणूक तर होणार नाही ना अशी विचारणा पाडेकर यांनी केली होती. काळजी करु नका तुम्ही चांगली माणसे आहात, तुम्ही निर्दोषच आहे, पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन तुम्हला तुमची रक्कम देणार असल्याचे सांगितले. 24 मे पासून वारंवार पाडेकर यांना फोन केला. त्यांचा विश्वास संपादन केला आणी 10 दिवसानंतर फसवणुकीस सुरुवात केली.
- देशभरातील खात्यांवर रक्कम वर्ग
26 मे पासून 23 जून अखेर एक महिन्याच्या कालावधीमध्ये 7 कोटी 86 लाख रुपयांची रक्कम देशभरातील 16 विविध बँकाच्या खात्यांवर वर्ग करण्यात आली. उत्तरप्रदेश, चंदीगढ, बिहार, यासह महाराष्ट्रातील खात्यांचा वापर रक्कम वर्ग करण्यासाठी करण्यात आला आहे.
- वयोवृद्ध टार्गेट
डिजीटल अॅरेस्टमध्ये फसवणूक करण्यासाठी वयोवृद्ध लोकांना टार्गेटचा केले जाते. राजारामपुरी येथील डोंगरे यांचेही वय 73 होते तर पाडेकर यांचे ही वय 75 आहे. त्यांच्या पत्नीचे वय 72 च्या जवळपास आहे. वयोवृद्ध लोकांना बोलण्यात गुंडाळणे तसेच भिती घालणे सोपे असते. यामुळेच त्यांची फसवणूक केली जाते.
- या खात्यांवर रक्कम वर्ग
तारीख खातेधारकाचे नाव बँकेचे नाव ट्रान्सफर रक्कम
26.05.25 पुना राम फिनोपेमँट बँक 30,10,848
18.6.25 इशान टोबीदेवी बँक ऑफ महाराष्ट्र 20,00,000
29.5.25 काईटर हॉस्पीटॅलीटी इंडसइंड बँक 85,00,000 अॅड रियल इस्टेट प्रा
लि चिंचवड महाराष्ट्र
29.5.25 मारुती इंटरप्रायजेस इंडसइंड बँक 95,00,000
4.6.25 सह्याद्री ट्रेडर्स आय.डी.एफ.सी 85,00,000
फर्स्ट बँक,नवी
मुंबई
5.6.25 क्लासिक कंस्ट्रक्शन येस बँक, चंदीगड 60,00,000
5.6.25 एएमजी ऑटो एजन्सी येस बँक,आंध्रप्रदेश 60,00,000
9.6.25 प्रमोद बापूराव पवार बँक ऑफ महाराष्ट्र 35,00,000
पाचोरा
9.6.25 सुमित प्रल्हाद मिस्त्रि उत्कर्ष स्मॉल फायनान्स 15,00,000
बँक,मिरा भाईदर
10.6.25 सुमित प्रल्हाद मिस्त्रि उत्कर्ष स्मॉल फायनान्स 30,00,000 बँक
10.6.25 मनोजकुमार यादव राजस्थान मरुधरा ग्रामीण 71,00,000
बँक मनोहरपुर
11.6.25 पुष्पेद्रसिंग बँक ऑफ महाराष्ट्र 35,00,000
प्रयागराज उ.प्रदेश
11.6.25 अभय चंद्रभान लोहार बँक ऑफ महाराष्ट्र 35,00,000
नाशिक
12.6.25 कश्यप विकलांग कले यस बँक बिहार 60,00,000
12.6.25 सागर टेडर्स इडसइंड बँक महू 60,00,000
23.6.25 वैष्णवी कैलास उबाले बँक ऑफ महाराष्ट्र 10,10,848
खडकी अकोला
एकूण 7,86,21,696








