हे तर ऑपरेशन गद्दारी सुरू- माजी आमदार वैभव नाईक
कोल्हापूर
मराठी देवीच्या यात्रेला राज्यातून वेगवेगळे नेते येत असतात. यात्रेमध्ये कोणतेही राजकारण आणणार नाही आम्ही सर्वाच स्वागत करू, त्यांचा देखील स्वागत करू. असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
त्यांना उद्घव ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, मार्चपासून त्यांचे दौरे सुरू होतील लोकांना ते भेटत आहेत. लोकांना पुन्हा एकदा विश्वास देण्याचा आणि उभा करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात करू. त्यांना एवढे धक्के बसून देखील त्यांच्या मागे अजूनही लोक आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी आहे हे येत्या काळात आम्ही दाखवून देऊ.
प्रताप सरनाईक यांच्या बद्दल विचारणा झाली असताना नाईक म्हणाले, काही गोष्टी प्रताप सरनाईक यांच्या हातात राहिल्या नाहीत. एसटीमध्ये बदल करण्याचा कोणताही अधिकार त्यांना राहिलेला नाही त्यामुळे ते काय बोलत आहेत हे पाहण्याची गरज नाही.
धनंजय मुंडे बोलताना नाईक म्हणाले, आजारी पडायच्या आधी ४०-५० दिवस त्यांच्यावर आरोप होत आहेत त्याचे उत्तर त्यांनी कधी दिलेलं नाही मग आजारी असताना उत्तर देण्याची अपेक्षा का ठेवावी .
कोकाटे लोकांपासून दूर होत आहेत हे दिसत आहे. या सरकारमध्ये गेल्या वेळी ज्या पद्धतीने संजय राठोड आणि वादग्रस्त असे काही मंत्री होते. त्या पद्धतीने या सरकारमध्ये देखील आहे. या सर्वांना अभय आहे. विरोधी पक्षांना विनंती आहे यांना कोणी राजीनामा मागू नका कारण हे सरकार काहीही ऐकत नाही, असे ही नाईक म्हणाले,
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबद्दल बोलताना नाईक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी भूषण आहे. सिंधुदुर्ग किल्ला समोर हे स्मारक होत आहे. गेल्या वेळेस देखील स्मारक झालं होतं मात्र त्यात दुर्दैवाने भ्रष्टाचार झाला आणि पुतळा कोसळला होता. आता तेथे पुन्हा स्मारक होत आहे आणि नेते वेगवेगळे घोषणा करत आहे. मात्र पुतळा कोसळल्यानंतर पुन्हा तुम्ही स्मारक उभं करत आहे, यामुळे या सत्ताधारी नेत्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. केवळ हे स्मारक कशा पद्धतीने चांगले होईल याकडे लक्ष द्या.
Previous Articleजि.प.शाळा दुरुस्तीसाठी ३ कोटी ६३ लाख मंजूर
Next Article दोडामार्गात वनकर्मचाऱ्यांवर गांधील माशांचा हल्ला








