कोल्हापूरः
विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिह्यात २० नोव्हेंबर रोजी उत्साहाने मतदान पार पडले. जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यावेळी तालुका निहाय फेऱ्या होऊन मतमोजणी होणार आहे.
तालुका निहाय फेऱ्या या पद्धतीने पार पडतीलः
इचलकरंजी मतदार संघ – २० फेऱ्या
राधानगरी मतदार संघ – ३१ फेऱ्या
चंदगड मतदार संघ- २८ फेऱ्या
करवीर मतदार संघ – २६ फेऱ्या
कागल मतदार संघ – २६ फेऱ्या
शाहुवाडी मतदार संघ – २५ फेऱ्या
हातकणंगले मतदार संघ – २४ फेऱ्या
कोल्हापूर दक्षिण मतदार संघ – २३ फेऱ्या
कोल्हापूर उत्तर मतदार संघ – २३ फेऱ्या
शिरोळ मतदार संघ – २२ फेऱ्या
अशा पद्धतीने मतमोजणी होईल आणि २३ नोव्हेंबर दुपारपर्यंत निकाल जाहीर होईल.








