नवी दिल्ली : राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर पक्षश्रेष्ठी इतर नेत्यांवर नाराज असल्याचे चिन्ह पहायला मिळत आहे. राजस्थान मधील सत्तेवर संकट घोंगावत असताना दिल्लीतून विविध राज्यातील नेत्यांना एक प्रकारे इसारा देण्यात आला आहे. यामध्ये पक्षाच्या इतर नेत्याविरूध्द सार्वजनिक ठिकाणी विधान करू नये असा सल्ला वजा इशारा दिला गेला आहे. तसेच या गोष्टीचे उल्लंघन केल्यास “कठोर शिस्तभंगाची कारवाईस सामोरे जावे लागेल” असा दमही पक्षाने दिला आहे.
अशोक गेहलोत यांची अध्यक्षपदासाटी उमेदवारी आणि त्यातच त्यांच्या मुख्यमंत्रीपद न सोडण्याच्या अट्टाहासामुळे राजस्थान कॉंग्रेसमध्ये गदारोळ माजला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि कॉंग्रेस नेते सचिन पयलट यांच्यातील राजकिय कुरघोडाचा फटका राज्यातील सत्तेला बसण्याची चिन्हे दिसत होती. दरम्यान, दिल्ली येथे सोनिया गांधी यांच्याबरोबर झालेल्या बैठकिनंतर अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदाच्या शर्य़तीमधून माघार घेत मुख्यमंत्री राहणेच पसंत केले.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर काही तासातच हे निर्देश आल्याचे कळते. हा इशारा बंडाच्या तयारीत असलेल्या गेहलोत समर्थक नेत्यांना अप्रत्यक्षरित्या दिला गेला आहे. राज्यातील नेतृत्व बदलावर गेहलोत निष्ठावंतांनी उघड बंड केले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ते मुख्यमंत्री राहतील की नाही याचा निर्णय गांधी घेतील’ असे म्हणाले होते. सोनिया गांधी एक-दोन दिवसांत राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतील असे पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









