सप्तकोटेश्वर मंदिर जीर्णोद्धाराबद्दल गोमंतकीयांना शुभेच्छा
प्रतिनिधी/ पणजी
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी पेलेल्या आणि गोव्याचे ’राज दैवत’ असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांच्याच वंशजाच्या हस्ते होणे हा एक दुर्लभ योग आहे. आपले वैभव जपण्याचा हा अतिशय गौरवास्पद क्षण आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तमाम गोमंतकीयांसह महाराष्ट्र आणि देशभरातील जनतेला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
पोर्तुगिज तसेच बहामनी राजवटीत भारताचा देदीप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर 1668 मध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या गोवा भेटीत नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर मंदिराची पुनर्बांधणी केली. त्याच मंदिराचा पुन्हा एकदा जिर्णोद्धार करण्यात आला असून त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लाभले याबद्दल फडणवीस यांनी त्यांची प्रशंसा केली आहे.
सदर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम मुंबईतील वास्तुसल्लागार राहुल चेंबुरकर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण झाले असून दि. 11 फेब्रुवारीपासून ते दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्याबद्दल श्री. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.









