इंटरनेटवर दररोज अनेक प्रकारे खाण्यापिण्याच्या गोष्टींची छायाचित्रे किंवा त्यांच्या पाककृतींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशा स्थितीत जेव्हा गोष्ट देशी आणि चटपटीत खाण्याची येते, तेव्हा प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटू शकते.
एका व्हिडिओत तुम्हाला अत्यंत मोठय़ा आकाराचा समोसा दिसून येतो. या समोशासोबत दोन मोठय़ा भांडय़ांमध्ये लाल रंगाची गोड चटणी आणि हिरव्या रंगाची आंबट चटणी ठेवण्यात आली होती. याच्यासमोर उभ्या असलेल्या मुलीने या व्हिडिओत सर्वांना अचंबित केले आहे.
या व्हिडिओत मुलीने समोसा खाण्यासाठी एक मोठय़ा चाकूने तो कापण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. मुलीच्या चेहऱयावरील हास्य आणि डोळय़ांमधील समोसा खाण्याची लालसा स्पष्टपणे झळकत होती. या व्हिडिओवर अनेक लोकांनी कॉमेंट केली आहे.
प्रत्यक्षात ही मुलगी फूड ब्लॉगर असून अशा अतरंगी खाद्यपदार्थांच्या गोष्टींची छायाचित्रे आणि व्हिडिओज शेअर करत असते. या व्हिडिओला आतापर्यंत 20 दशलक्षांपेक्षा अधिक जणांना पाहिले आहे. एवढेच नाही तर 4 लाखांहून अधिक जणांनी या व्हिडिओला लाइक केले आहे.









