प्रतिनिधी/बेळगांव: हुलबत्ते कॉलनी, शहापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराजवळ एक जुना लोखंडी पूल आहे. येथील जनतेला ये-जा करण्यासाठी याची निर्मिती अनेक वर्षांपूर्वी करण्यात आली आहे पण आता याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे.
पूल वाकलेला, गंजलेला आणि तुटलेला आहे. लोखंडाचे तीक्ष्ण गंजलेले तुकडे हानिकारक बनले आहेत. या पुलाच्या पुढे एक खाजगी शाळा आहे. हा पूल हुलबत्ते कॉलनी ते शास्त्रीनगरला संपर्क जोडतो तसेच पुलाच्या मध्यभागी मोठे खड्डे आहेत. कृपया संबंधित विभागाचे तांत्रिक कर्मचारी आणि अभियंत्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन दुर्घटना घडण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करावी. दिवसाच्या वेळी आपण छिद्र आणि गंजलेला भाग पाहू शकतो परंतु रात्रीच्या वेळी समस्या होऊ शकते असे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांनी सांगितले आहे.









