क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी दिलेली माहिती
वृत्तसंस्था/ मेलबर्न
क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)भारत आणि इंग्लंडविऊद्ध घरच्या मैदानावर होणारी महिला क्रिकेट कसोटी मालिका सध्याच्या एका सामन्याऐवजी तीन सामन्यांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे, असे त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी सांगितले आहे.
‘सीए’च्या या सर्वोच्च अधिकाऱ्याने सांगितले की, प्रशासकीय मंडळ महिलांच्या क्रिकेटमध्ये अधिक कसोटी सामने खेळविण्याचा मुद्दा पुढे रेटत राहील. वकिली करत राहील”. गेल्या आठवड्यात मुंबईत ऑस्ट्रेलियाच्या भारताकडून स्वीकाराव्या लागलेल्या ऐतिहासिक पराभवानंतर हॉकली यांनी हे मत व्यक्त केले आहे. 1984 नंतर भारतात प्रथमच कसोटी खेळताना वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एकमेव लढतीत ऑस्ट्रेलियाचा भारताने आठ गडी राखून पराभव केला.
आम्ही बहुस्वरूपी मालिकेच्या माध्यमातून अधिक कसोटी क्रिकेट खेळविण्याचा पुरस्कार करत राहू. कदाचित भविष्यात आम्ही तीन कसोटी सामन्यांच्या महत्त्वाच्या मालिकेबद्दल विचार करू शकतो, असे त्यांनी सांगितले आहे. यात ऑस्ट्रेलियासमवेत फक्त इंग्लंड व भारताचा समावेश असेल. कारण न्यूझीलंड इच्छुक नाही. मुंबईतील पराभव हा 11 कसोटी सामन्यांमधील भारताविऊद्धचा ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव होता. त्यानंतर कर्णधार हिली म्हणाली की, तिला कसोटी क्रिकेटमध्ये अधिक प्रमाणात सहभागी व्हायला आवडेल.
तीन सामन्यांच्या स्वरुपातून खरी स्पर्धा निर्माण होईल. आमच्या गटासाठी हा एक अविश्वसनीय अनुभव असेल आणि कदाचित दोन्ही बाजूंच्या क्षमतेची खरी कसोटी लागेल, असे हिलीने म्हटले होते. ती म्हणाली होती. एकापेक्षा जास्त सामन्यांची शेवटची महिला कसोटी क्रिकेट मालिका 2006 मध्ये खेळली गेली होती, तर भारताने मागील नऊ वर्षे कसोटी क्रिकेटचे आयोजन केले नव्हते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका खेळविण्यात येणार असून त्यानंतर नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर तीन टी-20 सामने होणार आहेत.









