महिलांच्या स्वबलंबनासाठी नवीन योजना तयार होणे गरजेचे ; महिला व बालकल्याण मंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन,आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिला भगिनींचा गौरव.
वाळपई : महिला भगिनी आज झपाट्याने विकासाच्या प्रवाहात सहभागी होताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देऊन आर्थिक स्तरावर स्वावलंबी करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या माध्यमातून महिलांसाठी नवीन योजना तयार करणे गरजेचे आहे .यासाठी महिला व बालकल्याण खात्याच्या अधिक्रायांनी पुढाकार घ्यावा. राष्ट्रीय महिला दिनानिमित्त अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी पुढील वर्षापासून शक्य असल्यास महिलांचा उत्सव साजरा करण्यावर भर देण्यात असल्याचे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री विश्वजीत राणे यांनी दिले आहे. वाळपई कदंबा स्थानकाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते .
यावेळी गोव्याचे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्राया उद्योजिका सामाजिक कार्यकर्त्या कर्मचारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पर्ये मतदार संघाचे आमदार डॉ. देविया राणे यांनी यावेळी बोलताना आजची महिलाही अबला राहिलेली नाही ती पूर्णपणे सबला झालेली आहे. प्रत्येक स्त्राrच्या विकासाच्या मागे पुऊषांचा हात असतो. ज्यावेळी आपल्याला राजकारणात प्रवेश करण्याची संधी उपलब्ध झाली त्यावेळी राणे घराला मोठा राजकीय इतिहास होता. यामुळे थोडीशी भीती वाटत होती. तरीसुद्धा विश्वजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गोष्टीला सहकार्य प्राप्त झाले व त्यामागे जिद्द लावून आपण आपले कार्य सिद्ध करीत आहे .यासाठी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे महत्त्वाचे श्रेय असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर महिला व बालकल्याण खात्याच्या संचालिका दीपाली नाईक उपसंचालक ज्योती देसाई नगराध्यक्ष सेहझीन शेख उपनगराध्यक्ष अनिल काटकर जिल्हा पंचायत सभासद सौ. देवयानी गावस सौ. राजश्री काळे, उमाकांत गावडे नगरसेवक सौ. प्रसन्ना गावस, सरफराज सय्यद विनोद शिंदे, भिंरोडा सरपंच उदयसिंग राणे पिसुर्ले सरपंच देवानंद परब ठाणे सरपंच सरिता गावकर केरी सरपंच दीक्षा गावस होंडा सरपंच शिवदास माडकर नगरगाव सरपंच संध्या खाडीलकर म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे खोतोडा सरपंच नामदेव राणे रामनाथ डांगी व इतर यांची उपस्थिती होती. यावेळी वाळपउ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सेहझीन शेख जिल्हा पंचायत सभासद देवयानी गावस राजश्री काळे केरी सरपंच दीक्षा गावस यांनी विचार मांडले. सुऊवातीला पारंपारिक समई प्रज्वलित करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन पारसेकर यांनी केले तर शेवटी ज्योती सरदेसाई यांनी आभार व्यक्त केले.









