पुणे / प्रतिनिधी :
खराडी येथील कॉर्पोरेट ऑफिसमधील अमेरिकेसह इतर देशातील 3 लाख 7 हजार 492 रुपयांचे परकीय चलन चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन तानाजी चव्हाण (वय 30, रा. मांजरी) यांनी याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सात ऑगस्टच्या रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे सिनॅप्स प्रा. लिमिटेड या मेडिसिन बनवणाऱ्या कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस आहे. चोरटय़ाने दरवाजा तोडून ऑफिसमध्ये प्रवेश केला. प्रवेश करून अकाउंट आणि डायरेक्टरच्या केबिनचा दरवाजा तोडला. तेथील ड्रॉव्हरमधील 9 हजार 700 रुपये रोख आणि अमेरिका, मलेशिया, इंग्लंड या देशाचे परकीय चलन असे 3 लाख 7 हजार 492 रुपये चोरून नेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे करत आहेत.









