२ लाख ४१ हजारांचा माल जप्त; सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कारवाई; दुधनी येथील तीन चोरट्यांना अटक
सोलापूर प्रतिनिधी
रेल्वे प्रवासात प्रवासी महिलांच्या झोपेचा फायदा घेवून चोरट्यांनी त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांनी व इतर वस्तूंनी भरलेला लेडीजपर्स पळवित होते. या संबंधात सोलापूर लोहमार्ग रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी करून चोरट्यांना जेरबंद केले आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे प्रवाशी तिकीट काढून प्रवासादरम्यान प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेवून प्रवाशांचे डोक्याजवळ ठेवलेले लेडीज पर्स चोरून गुन्हे केले आहे. याबाबत सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भादंविच्या कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग सोलापूर यांनी केला. त्यात सोलापूर, दुधनी रेल्वे स्थानक परिसरात तांत्रिक पद्धतीने अभ्यास करण्यात आला. आरोपी हे दुधनी येथील स्थानिक रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आरोपी १) मल्लीनाथ बसवराज आळंद वय ३० वर्षे रा. भाजीपाला मार्केटजवळ दुधनी ता. अक्कलकोट जि. सोलापूर सध्या रा. नेताजी शाळेजवळ निकमनगर सोलापूर जि. सोलापूर. २) शिवानंद मल्लीनाथ कुंभार वय ३९ वर्षे राह. मु पो दुधनी ता. अक्कलकोट जि. सोलापूर सध्या रा. मु. पो. भंकलगी ता. सिंदगी जि. विजयपूर राज्य कर्नाटक ३) अंबादास विलास जाधव वय २५ वर्षे रा. मु. पो. दुधनी ता. अक्कलकोट जि. सोलापूर सध्या रा. शिवलिंगनगर म्हैत्रे यांचे घराजवळ एमआयडीसी सोलापूर यांना तेथे जावून त्यांना मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील सोन्याचे दागिने व इतर माल असा एकूण २ लाख ४१ हजार रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे तुषार दोषी, अपर पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) सोलापूर लोहमार्ग विभाग संगीता हत्ती, सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. जे. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव, पोलीस हवालदार रंगनाथ पवार, पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष सवळी, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर खरात, पोलीस कॉन्स्टेबल संतोष बाबर यांनी केली आहे.
हा मुद्देमाल करण्यात आला जप्त
५४,००० हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे चैन त्यास जाळीदार फुलाचे पेंडल असलेले १८ ग्रॅम वजनाचे जु.वा
१५,००० हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे प्लेन अंगठी वजन ०५ ग्रॅम
१४००० हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचे काळ्या रंगाचे मोबाईल फोन त्यात सिमकार्ड नाही.
५००० हजार रुपये किमतीची चांदीची अंगठी त्यात खडा असलेली वजन १० ग्रॅम
६०,००० हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे ब्रासलेट १७ ग्रॅम वजन
५३,००० हजार रुपये किमतीचे एक सोन्याची चैन १५ ग्रॅम वजन
१२,००० हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स
८०० रुपये चांदीचे जोडवे
३००० हजार रूपये रोख रक्कम असे एकूण २ लाख ४१,००० हजार रुपये किमतीचे ६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व मोबाईल, रोख रक्कम असे हस्तगत करण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.