छप्पराची कौले काढून चोराने केला घरात प्रवेश !
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील माठेवाडा येथे काल सायंकाळी ५ ते रात्री १० या कालावधीत घरफोडीचा प्रकार घडलाय. कुडाळ शहरात कांदे -बटाटे विक्रीचा व्यवसाय करणारे बालाजी घाडगे यांच्या ते भाड्याने राहत असलेल्या घरात चोरट्याने छप्पराची कौले काढून घरात प्रवेश केला . रोख २५ हजार रुपये आणि १ लाख ६ हजारांचा दागिन्यांचा ऐवज लंपास केलाय .दरम्यान या परिसरातील गेल्या दोन महिन्यातील चोरीची ही तिसरी घटना आहे . या घटनेचा पोलीस तपास सुरु आहे .









