इचलकरंजी, प्रतिनिधी
विवेकानंद कॉलनीमधील वामन गजानन तेरवाडकर यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. बंगल्यातील बेडरूम मधील कपाट फोडून त्यातील 400 अमेरीकन डॉलर, देवपुजेचे चांदीची भांडी, चांदीचे दागीने आणि बारा हजाराची रोकड असा ९२ हजारा रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. घरफोडीची ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.
वामन तेरवाडकर याचा रंग विक्रीचा व्यवसाय आहेत ते सहकुंटुंब 7 मे रोजी देवदर्शनासाठी बाहेर गावी गेलो होतो. जाताना त्यांनी राहत्या बंगल्याला कुलूप लावून गेला होते. तसेच त्यांच्या बंगल्यात कोणीही नव्हते. यांची संधी साधून चोरट्याने त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. बंगल्यातील बेडरूम मधील कपाट फोडून त्यातील 400 अमेरीकन डॉलर,देवपुजेचे चांदीची भांडी,चांदीचे दागीने आणि बारा हजाराची रोकड असा ९२ हजारा रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला.
Previous Article‘मोचा’ वादळ बांग्लादेश-म्यानमार किनारपट्टीकडे जाणार
Next Article Kolhapur : शहरात आज पाणी पुरवठा बंद









