सहा लाखांचा ऐवज लंपास : 5,629 बाटल्या पळविल्या
वार्ताहर/रामदुर्ग
शहरातील बेळगावमार्गावर असणाऱ्या एमएसआयएल दारूच्या दुकानाचे कुलूप तोडून दारूसह सहा लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. याचबरोबर दुकानाला बसविण्यात आलेला सीसी कॅमेरा व डीव्हीआरही चोरण्यात आला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. याबाबत माहिती अशी, नेहमीप्रमाणे दुकान मालक रात्री 10 वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी 11 च्या दरमान्य दुकान उघडण्यात आले असता ही घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी अंदाजे विविध प्रकारच्या दारूच्या 5,629 बाटल्या लांबविल्या असून असून त्याची किंमत 5 लाख 78 हजार 665 इतकी आहे. याची माहिती मिळताच घटनास्थळी पीएसआय सविता मुन्याळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भेट देत पाहणी केली. या घटनेची नोंद रामदुर्ग पोलीस स्थानकात झाली असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.









