जमखंडी पोलिसांची कारवाई : चोरटा अथणीचा
वार्ताहर /जमखंडी
शहर परिसरातील चोरीप्रकरणी जमखंडी पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याकडून अंदाजे पाच लाख किमतीचे दागिने जप्त केले. सदर चोरटय़ाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख लोकेश जगलासर यांनी दिली. अस्लम सनदी (रा. अथणी) असे चोरटय़ाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयास्पदरित्या फिरणाऱया एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने जमखंडीतील लक्कन तलावाजवळील प्रकाश सिद्धलिंगप्पा बागलकोट, कैलास लॉजमागे असलेल्या एच. बी. कॉलनीमधील शिवानंद पराप्पा पारशेट्टी यांच्यासह विजापूर बीएलडीई कॉलेजनजीकच्या आदर्शनगरमधील एका घरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 9 तोळे सोन्याचे व 85 ग्रॅम चांदीचे दागिने असा अंदाजे 4 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर चोरटय़ाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
पोलीस खाते सतर्क
जमखंडी परिसरात काही दिवसांपासून चोरीचे प्रकार वाढल्याने पोलीस खाते सतर्क झाले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत डीवायएसपी एम. पांडुरंगय्या यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय एम. आय. मठपती, पीएसआय बसवराज कोन्नुरे, जी. आर. बिरादार, कॉन्स्टेबल के. पी. सौंदत्ती, बी. एम. जंबगी, एम. एन. मांग, पी. एच. घाडगे, एस. बी. हनगंडी, आर. एच. पुजार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता. बागलकोट जिल्हा पोलीसप्रमुख लोकेश जगलासर यांनी पोलिसांचे कौतुक केले.









