वृत्तसंस्था/ मेलबर्न
2024 च्या टेनिस हंगामातील येथे 14 ते 28 जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्याकरीता ऑस्ट्रीयाचा माजी अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेता डॉम्निक थिएम तसेच ब्रिटनची एम्मा रॅडुकॅनू यांना पात्र फेरीत खेळावे लागणार आहे.
2024 च्या टेनिस हंगामामध्ये दर्जेदार कामगिरी करण्यासाठी अनेक देशांचे टेनिसपटू सज्ज झाले आहेत. दरम्यान काही टेनिसपटू दर्जेदार कामगिरी करण्यासाठी जोरदार सराव करीत आहेत. 2020 च्या टेनिस हंगामातील अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारे स्विसचे रॉजर फेडरर, स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाचा टॉप सिडेड जोकोविच यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी थिएम प्रयत्न करीत आहे. 30 वर्षीय थिएम हा एटीपीच्या मानांकनात 58 व्या स्थानावर आहे. 2021 च्या न्यूयॉर्कमध्ये झालेल्या टेनिस स्पर्धेत 98 व्या मानांकित थिएमने पहिला सामना जिंकला होता. मात्र त्याला दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. 14 ते 28 जानेवारी दरम्यान खेळविल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉपूर्वी पात्र फेरीची स्पर्धा 8 जानेवारीपासून सुरू होणार आहे.









