प्रतिनिधी /बेळगाव
यरगट्टी नगरपंचायतीच्या अखत्यारित येणाऱया बुदीगोप्प या गावासह इतर परिसरात तीन घरे फोडून चोरी करणाऱया चोरटय़ाला मुरगोड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सोने, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे जिल्हा पोलीसप्रमुख संजीवकुमार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या चोरटय़ाने तीन घरे फोडून 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले होते. त्याची किंमत एकूण 3 लाख 30 हजार रुपये इतकी होते. 210 ग्रॅम चांदीचे व रोख 8 हजार 300 रुपये त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. रामदुर्गचे डीएसपी रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोडचे सीपीआय मौनेश्वर माळी पाटील आणि त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. या पथकामध्ये बी. एस. अलगरराऊत, व्ही. डी. सकरी, एम. बी. सन्ननायकर, ए. व्ही. ज्योत्याप्पण्णावर, बी. एस. अंतरगट्टी, आय. एस. वकुंद, एस. एम. जवळी, आर. बी. ससालट्टी, एम. एस. औरादी, एच. आर. न्यामगौडर यांचा समावेश होता.









