१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
१६६ एटीएम कार्ड जप्त
पुणे
गेल्या काही महिन्यापासून शहरातली विविध भागात एटीएममध्ये पैसे काढणास आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा बहाणा करून त्यांच्याकडून पैसे चोरणाऱ्या चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. विश्रामबाग पोलिसांनी कर्नाटकातील चोरट्याला अटक असून हा चोरटा कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून फसवणुकीचे १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. याशिवाय त्याच्याकडून मोटार, दुचाकी, रोख रक्कम तसेच १६६ एटीएम कार्ड असा एकूण १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राजू प्रल्हाद कुलकर्णी (वय ५४, अलानहली, म्हैसूर, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी राजू हा सऱ्हाईत गुन्हेगार असून त्याने २१ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
एटीएम मधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांना मदतीचा बहाणा करून कुलकर्णी त्यांचे एटीएम कार्ड चोरायचा. त्यांच्याकडून पासवर्डही जाणून घ्यायचा. त्यानंतर आरोपी कुलकर्णी एटीएममधून पैस निघत नाही, असे सांगून ज्येष्ठांना त्याच्याकडील खराब एटीएम कार्ड द्यायचा. आणि ज्येष्ठांकडील एटीएम कार्ड चोरून पसार व्हायचा. एटीएम कार्डचा गैरवापर करून तो पैसे काढून घ्यायचा, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.
विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजवे चौकात एका बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तपास चालू असताना, तांत्रिक तपासात आरोपी कुलकर्णीने ज्येष्ठाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. दरम्यान आरोपी कुलकर्णी पसार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला कर्नाटकातून ताब्यात घेतले, असेही पोलि उपायुक्त गिल यांनी सांगितले.








