Trending saree in 2022: साडी हा प्रत्येक स्त्रीला आवडणारा वस्त्रप्रकार आहे. कोणत्याही साडीमध्ये स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसतं.कोणत्याही सणसमारंभात साडीलाच जास्त पसंती दिली जाते. आज आपण २०२२ मध्ये कोणत्या साड्या ट्रेंडिंग होत्या,हे जाणून घेणार आहोत.
ऑर्गेन्झा साड्या
या वर्षी ऑर्गेन्झा साडी सर्वात जास्त ट्रेंड मध्ये पाहायला मिळाली. हलक्या वजनाची आणि पेस्टल टोन किंवा फुलांच्या प्रिंटची साडी पार्टी किंवा कोणत्याही कार्यक्रमात मॉडर्न लुक देते. या साडीमध्ये बरेच प्रकार देखील आले आहेत. त्यामुळे अशाप्रकारची एखादी साडी तुमच्या वॊर्डरॉब मध्ये असायला काहीच हरकत नाही.
प्लीटेड साड्या
प्लीटेड साड्या तुम्हाला झटपट ड्रेसी किंवा पार्टीसाठी उत्तम पर्याय आहेत. साध्या आणि सहज नेसता येईल अशी ही साडी यावर्षी ट्रेंड मध्ये होती.या साडीवर एखादा बेल्ट लावून तुमचा पार्टी लुक कलासि दिसू शकतो.नावाप्रमाणेच या साडीवर छोट्या छोट्या प्लेट्स पाहायला मिळतात.

पेस्टल सिल्क साडी
आधुनिक पेस्टल रंगांच्या या साड्या क्लासिक टच देतात.या साड्या शुद्ध किंवा शिफॉन मिश्रित सिल्क साड्यांमध्ये असतात, ज्या सर्व त्वचेच्या टोन आणि शरीराच्या प्रकारांसाठी सूट होतात.विविध पेस्टल रंगाच्या साड्यामध्ये अनेक एक्टरेस देखील पोझ देताना दिसल्या.

ऍनीमिटेड प्रिंट साड्या
जर तुम्हाला साडीमध्ये फॅन्सी किंवा क्रेझी लुक हवा असेल तर ऍनीमिटेड प्रिंट साड्या सुंदर दिसू शकते.वजनाने हलकी आणि साडीवर मोठी मोठी विविध आकाराची डिझाइन असलेली ही साडी या वर्षी सर्वांच्या पसंतीस उतरली.ही साडी कॉटन असल्यामुळे तुम्ही ऑफिससाठी देखील सहज कॅरी करू शकता.











