मारुती सुझुकी, हय़ुंडाईसह विविध कंपन्यांच्या सेडान, एसयूव्ही गटात येणार कार्स
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय बाजारात या महिन्यामध्ये मारुती सुझुकीसह विविध कंपन्यांच्या मोटारी लाँच होणार आहेत. यामध्ये सेडान आणि एसयूव्ही गटातील कारचाही समावेश असणार आहे. यामध्ये फोक्सवॅगन विर्टस, हय़ुंडाई वेन्यू यासह इतर गाडय़ा असणार आहेत. पाहू या कार्सबद्दल…
1. फोक्सवॅगन विर्टस- याच महिन्यात ही गाडी लाँच केली जाणार असून पेट्रोल इंजिनसह सदरची गाडी सादर केली जाणार आहे. 1.0 लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन अशा दोन मोटारी लाँच केल्या जाणार आहेत. सहा स्पिड मॅन्युअल आणि सहा स्पिड कन्व्हर्ट ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह ही गाडी सादर होणार आहे.

2. हय़ुंडाई वेन्यू फेसलिफ्ट- नव्या डिझाईन आणि अंतर्गत सजावटीसह सदरची गाडी लवकरच लाँच केली जाणार आहे. ही गाडी टूस्कॉन एसयूव्ही आणि विदेशात विकली जाणारी पॅलीसॅडे या गाडय़ांना समोर ठेवून तयार करण्यात आली असल्याचे समजते. 1.2 लिटर नॅचरली एस्पीपेटेड पेट्रोल इंजिन, 1.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 डिझेल इंजिनसह गाडी सादर केली जाणार आहे. 5 स्पिड मॅन्युअल गिअर बॉक्स, 6 स्पिड मॅन्युअल, 6 स्पिड आयएमटीसह ही गाडी विक्रीला उपलब्ध होणार आहे.
3. लेक्सस एलएक्स 500 डी- लेक्सस कंपनी लवकरच आपली एलएक्स एसयूव्ही, एलएक्स 500 डी या गाडय़ा सादर करणार आहे. सुव्ह गटातील गाडी 3.3 लिटर ट्विन टर्बो व्ही 6 डिझेल इंजिनसह येणार आहे. 10 स्पिड ऑटोमॅटीक ट्रान्समिशनची सोय यात असणार आहे.
4. महिंद्रा स्कॉर्पिओ-एन- कंपनीची नवी एसयूव्ही स्कॉर्पिओ-एन ही नवी गाडी 27 जूनला भारतीय बाजारात उतरविली जाणार आहे अशी माहिती आहे. या संदर्भातील नव्या गाडीचे फोटो नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहेत. या गाडीत एलइडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, फॉग लॅम्प आणि सी शेप एलईडी डीआरएल असणार आहे.
5. मारुती सुझिकी ब्रीझा- सदरची गाडी जूनच्या अखेर भारतीय बाजारात उतरविली जाण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. या सदरच्या कॉम्पक्ट एसयूव्ही वाहनाचे अंतर्गत आणि बाहय़अंतरंग सुंदर बनविण्यात आले आहे. यासह विविध आकर्षक वैशिष्टय़ेही यामध्ये असणार असल्याचे समजते. 1.5 लिटर के15 सी डय़ुअल जेट इंजिन याला असणार आहे.









